Breakup Mhanje Kay Aste Kavita

ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतं?
ज्याला मराठीत प्रेम भंग म्हणतात तेच असतं,
जुळलेले अनुबंध तोडणे असतं?
कि कधी ते जूळलेचं नव्हते हे उमगणं असतं…

कुणाचा तरी निरर्थक हट्ट असतो?
कि दोघांनी मिळून घेतलेला कठोर निर्णय असतो,
त्रास सहन करायला जमत नाही तो क्षण असतो?
कि त्याग करण्याची तयारी नसायचा पुरावा असतो…

दोन जीवांची घालमेल असते?
कि कोणा एकाचं तडफडण असतं,
पुन्हा एकदा नव्याने सुरवात असते?
कि आठवणींवर जगायची तयारी असते,
ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतं?

Page 2 of 36212345...102030...Last »