Aai Mi Kasa Visren Tula

आई तुझ्या संस्कारातुन,
कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला,
तुझ्यामुळेच मी महान झालो…

तुझा तो मायेचा पदर,
लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण,
नव्हता गं जात…

कधी तु मारलेस मला,
तुझा प्रेमळ करांनी,
पण दोष देशी स्वःताला काही क्षणांनी…

दुर जाता तुझ्यापासुन,
चिंता लागे तुझ्या जिवा,
जरी मी मोठा झालो,
तरी तुझा मायेचा पदर हवा…

Page 30 of 362« First...1020...2829303132...405060...Last »