तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवुन जा
जाता जाता या डोळ्यांना अश्रू न ढाळता जगायचं कस हे शिकवून जा
तुझ्या शिवाय रोज मरणाला सामोर जान शिकवून जा
तुझ्या शिवाय दोन घास आनंदाने कोण भरवणार
ते दोन घास तुझ्या शिवाय कशे खायचे ते शिकवून जा
तुझ्या शिवाय या जगा समोर जगायचं कस ते शिकवून जा
तू जाण्याचं दुःख असून ही नेहमी हसरा चेहरा कसा ठेऊ ते शिकवून जा
तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवून जा…!