Lagna Kavita Marathi

लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही वेंधळा असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं,
तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला “मस्त” म्हणायचं असतं…

लग्न म्हणजे काय असतं?
क्रिकेटमध्ये कितीही इंटरेस्ट नसला तरी त्याच्यासाठी ते एन्जॉय करायचं असतं,
बागेत जायचा कंटाळा आला असला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं…

लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही “म्हातारा” झाला तरी त्याला चिरतरुण भासवायचं असतं,
“मी जाड झालेय का?” या वाक्याला कधीही “हो” म्हणायचं नसतं…

लग्न म्हणजे काय असतं?
दोन्ही घराच्या नात्यांना आपुलकीने जपायचं असतं,
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना हसत हसत विसरायचं असतं…

लग्न म्हणजे काय असतं?
छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं कॉम्प्रोमाईज असतं,
कारण “म्हातारपणी एकमेकांना साथ देऊ” असं एकमेकाला केलेलं प्रॉमिस असतं…

Page 5 of 362« First...34567...102030...Last »