«

»

Prem He Asech Aste Kavita

प्रेम हे असच असतं,
करतांना ते कळत नसतं आणि
केल्यावर ते उमगत नसतं,
उमगल तरी समजत नसतं पण,
आपल वेड मन आपलच ऐकत नसतं…

ते फक्त त्या दोन जीवांनाच माहित असतं,
लोक म्हणतात काय असतं प्रेमात,
पण मी म्हणतो करून बघा एकदा
काय नसतं प्रेमात…

प्रेम हे सांगून होत नसतं,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असतं,
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो,
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो…

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते,
दोन शब्दात ती कधीच समजत नसते,
म्हणूनच प्रेम हे असच असतं,
पण ते खूप खूप सुंदर असतं…!

Give Your Comments Here