«

»

Protsahan Kavita – Tu Khachu Nakos

एक डाव हरला तरी त्यात काय एवढं?
कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोडं?
संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस…

सूर्य रोजच उगवतो त्याच नव्या तेजाने,
रोज मावळतीला जातो रोजच्याच नेमाने,
येणे जाणे रीतच इथली हे तू विसरू नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस…

प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत,
तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत,
अरे अशाच आपल्यांसाठी तुही थोडं हसून बघ,
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस…

वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी,
तुझ्यासाठी जगात असतं आस लावून प्रत्येक क्षणी,
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे अश्रू तू गाळू नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस…

उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडेt,
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे,
नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस…

सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल,
परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल,
विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस…

Give Your Comments Here