Category Archive: Marathi Scraps

Aathvan Mazi Aali Tar

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मिटून बघ,
सरलेल्या क्षणांमधले संवाद जरा आठवून बघ..

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ,
त्या पाउल वाटेवरती उमटलेली आपली पाउले बघ..

आठवण माझी आली कधी
तर उडणाऱ्या पक्षांकडे बघ,
त्यांच्यासारखंच माझ मन तुझ्याकडे धावत आलेलं बघ..

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ,
चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचा शब्द न शब्द आठवून बघ…

Page 5 of 77« First...34567...102030...Last »